मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बोगस मजूर प्रकरणात आज अटक होण्याची दाट शक्यता आहे. मात्र दरेकारांना अटक झाल्यानंतर त्यांना याप्रकरणात तात्काळ जामीन देखील मिळणार आहे. याआधीच बोगस मजूर प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाने तसे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आता यासाठी दरेकर हे पोलिस ठाण्यात जायला निघाले आहेत.
बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांना जर अटक झाली तर तात्काळ त्यांना जामिनावर सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे दरेकरांना अटक करून, त्यांच्या जामिनाची प्रक्रिया पोलिस ठाण्यातच पार पाडली जाणार आहे. ३५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन होईल. यापूर्वी दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने राजकारण करत मला अडकवल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलिस ठाण्यात जास्तीत जास्त हजेरी लावण्याची ड्युटी आमच्यामागे लावली जात आहे. आपल्याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. फक्त कायदेशीर प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पोलिस ठाण्यात जात आहे, असं दरेकर म्हणाले.
मुंबई जिल्हा बँकेवर संचालक पदी विराजमान होऊन महापालिकाकडून अटींचे उल्लंघन होत आहे. विष्णू घुमरे यांचे देखील निलंबन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र मजूर सदस्य म्हणून फक्त माझ्यावर कारवाई का केली जात आहे. मग विष्णू घुमरे यांच्यावरील कारवाईला इतका विलंब का झाला? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :