प्रती पंढरपूर येथे रात्रीपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी

जिल्हापरिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी अभिषेक आरती करून महापूजा केली

औरंगाबाद- प्रती पंढरपूर समजल्या जाणार्या औरंगाबादच्या पंढरपूर येथे रात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. अस म्हणतात कि विठ्ठल द्वारकेवरून पंढरपूरला जात असताना औरंगाबादच्या वाळूज नजीक असलेल्या ठिकाणी तो विसाव्यासाठी थांबला होता. त्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच ठिकाणी विठ्ठलाचे भव्य मंदिर उभारले गेले आणि या ठिकाणाला पंढरपूर असे नाव देण्यात आले. आषाढी एकादशीला ज्या भक्तांना मोठ्या पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते या प्रती पंढरपूरला येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. या वर्षी जिल्हापरिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी आपल्या पती समवेत रात्री बाराच्या सुमारास अभिषेक आरती करून महापूजा केली. त्यानंतर भक्तांनी एकच गर्दी करत आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. प्रती पंढरपूर येथे जवळपास दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिवसभरात जवळपास लाखो भाविक दर्शन घेतील असा अंदाज पंढरपूर देवस्थानाने वर्तवला आहे.

 

BYTE – पांडुरंग कुलकर्णी – पुजारी प्रती पंढरपूर

You might also like
Comments
Loading...