स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

टीम महाराष्ट्र देशा :  दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गर्लफ्रेंड सान्या सागर हिच्यासोबत तो लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

येत्या 22 जानेवारीला लखनऊ येथे प्रतिकचा साखरपुडा होण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही धामधुमीशिवाय हा साखरपुडा पार पडणार आहे आणि कुटुंबातील जवळचे लोक यात सहभागी होणार आहेत. 

प्रतिक आणि सान्या गेल्या 8 वर्षांपासून प्रतिक-सान्या एकमेकांना ओळखतात पण एक वर्षापासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

सान्याने मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून प्रशिक्षण घेतल्यानतंर तिने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध व्यक्तींसोबत सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. 

यामुळेच प्रतिकसोबतच तिची फिल्मी जगतातील अनेक लोकांशी मैत्री आहे. प्रतिकची होणारी नववधू सान्या सागरने तिचे शिक्षण लंडनमधून पूर्ण केले आहे.

प्रतिक आणि सान्या गेल्या 8 वर्षांपासून प्रतिक-सान्या एकमेकांना ओळखतात पण एक वर्षापासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

प्रतिकने आतापर्यंत ‘जाने तू या जाने ना’, ‘एक दीवाना था’, ‘धोबी घाट’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता आगामी चित्रपट ‘बागी 2’ मध्ये तो झळकणार आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 
You might also like
Comments
Loading...