बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हे खासदार प्रतापराव जाधव यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना सांगितल्या शिवाय ते पाऊल उचलत नाहीत. त्यामुळे या पाठीमागे नेमकं काय शिजतंय. याबाबतीत चर्चेला उधाण आलं आहे. त्यावर आता प्रतापराव जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदार सकाळपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे बुलढाणाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन्ही आमदारांना एकनाथ शिंदेकडे पाठवले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या. मात्र आता खासदारांनी आपला दोन्ही आमदारांशी संपर्क झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :