Share

Prataprao Jadhav | “मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला…”; शिंदे गटातील नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सध्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप, टीका करत आहेत. अशातटच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले प्रतापराव जाधव ?

मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेले जात होते, असा आरोप प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मेहकरमध्ये गुलाबराव पाटील पालकमंत्री झाले म्हणून त्यांच रॅली काढून जोरदार स्वागत करण्यात आलं.त्यानंतर हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होता. या कार्यक्रमाच्यावेळी प्रतापराव जाधव यांनी हे आरोप केले आहेत.

ते म्हणाले की, अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते.

दरम्यान, प्रतापराव जाधव यांच्या खळबळजनक आरोपवर शिवसेना काय प्रत्युत्तर करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सध्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now