Share

Pratap Sarnaik | “सुषमा अंधारेंनी आधी आपला…”, प्रताप सरनाईकांचा पलटवार

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी नरेंद्र मोदींची नक्कल देखील केली. याप्रकरणी शिवसेना पक्षातील काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे देखील आहे. अलिकडे अंधारे मोठ्या प्रमाणात शिंदे गटावर टीका करत असतात. यावरुनच एकनाथ शिंदे गटातील प्रताप सरनाईक यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

मला लोकांची विकास कामे करायची आहेत. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे. अशी जर एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महाप्रबोधन यात्रा सुरू केल्यानंतर चार दिवसांनंतर शिवसेनेच्या उद्धव गटाने नवी मुंबईत रॅली काढली. शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दुसरी यात्रा वाशीतील विष्णुदास भावे सभागृहात पार पडली.

सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल –

ठाण्यातील कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 9 तारखेला सभा झाली आणि 12 तारखेला गुन्हा दाखल झाला. अद्याप कुठे दंगल झालेली नाही मग चिथावणीखोर वक्तव्य कसं काय म्हणाता येईल? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now