ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या भेटीला!

sanjay raut and pratap sarnaik

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांना सोबत घेऊन गेले आहेत अस वृत्त विविध माध्यमातून समोर येत आहे.

त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच एक घर आहे. तेथे विहंग यांना ईडीचे पथक घेऊन गेल्याचे कळते. . ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरासोबत त्यांच्या कार्यालयामध्ये देखील ईडीने धाड टाकली. यामध्ये ईडीकडून मुंबई तसंच ठाणे परिसरातील 10 ठिकाणी शोधमोहीम सुरु केली. ईडीच्या पथकाकडून सकाळी 8 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडींवरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आमदार प्रताप सरनाईक कुठे आहेत यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते.

मात्र, काही वेळापूर्वीच प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. सुमारे दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. तर, सरनाईक यांचा काही घोटाळा नसल्यास त्यांनी कारवाईला सामोरं जावं सत्य बाहेर येईल असं आव्हान देण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या