सैनिकांबद्दल अपशब्द वापरणारे प्रशांत परिचारक विधानसभेच्या मैदानात ?

prashant paricharak

टीम महाराष्ट्र देशा : ”गत निवडणुकीत 80 हजार मतदारांनी मतदान केले त्यांच्या अपेक्षा काही असून त्या लोकांना वाऱ्यावर न सोडता यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असून ‘आमच ठरलंय, जे ठरलंय ते लवकरच कळणार” असे सुचक विधान करत विधानसभा लढविणार असल्याचे संकेत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले आहेत.

”आपण सहयोगी आमदार असून विधान परिषदेच्या पटलावर अपक्ष आमदार म्हणून नाव आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश व उमेदवारीवर कार्यकर्त्यांशी बोलून त्या त्या प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेणार आहे. सध्या युतीची चर्चा सुरू असून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार हे ही लवकरच स्पष्ट होणार आहे.” असं प्रशांत परिचारक म्हणाले आहेत.म्हैसाळ योजनेमध्ये नव्याने पाच गावांचा समावेश झाला याची माहिती देण्यासाठी मंगळवेढा येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी परिचारक बोलत होते.

दरम्यान, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य याच आमदार महाशायंनी केलं होत. यानंतर त्याचं निलंबन झालं खर पण दोन वर्षाच्या आतच हे निलंबन मागे घेण्यात आले होते. आता सैन्यदलातील जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे हे महाशय निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर मतदार त्यांना स्वीकारणार की त्यांची योग्य जागा दाखवणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या