fbpx

प्रशांत किशोर पेलणार शिवधनुष्य

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर यशस्वी रणनीतीकार प्रशांत किशोर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर निमंत्रण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर उचलणार आहेत.

शिवसेना – भाजप युतीचे घोंगडे भिजत पडले असताना, शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी नवनवीन खेळी खेळली जात आहे. यातच आता २०१४ मध्ये भाजपसाठी प्रचारातील चाणक्य ठरलेले प्रशांत किशोर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर येणार आहेत. त्यामुळे या भेटीत काय घडणार याकडे शिवसैनिकांसह भाजप नेत्यांचे देखील लक्ष लागले आहे.

२०१४ लोकसभेच्या निवडणुकांत प्रशांत किशोर यांनी भाजपच्या प्रचार रणनीतीमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. किशोर यांनी प्रचाराचे नवनवीन फंडे वापरत संपूर्ण देशाचे वातावरण मोदीमय केले होते. मध्यंतरी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत शिवसेनेच्या प्रचार रणनीतीवर चर्चा होणार असल्याचं कळतय.

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदार यांची महत्वाची बैठक मातोश्रीवर सुरु आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या उमेदवारांवर शेजारील मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्याच बरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांच्यी जबाबदारीही देण्यात येणार आहे.

या बैठकीनंतर शिवसेना महाराष्ट्रातील ४८ पैकी किती लोकसभा मतदार संघात सक्रिय ताकत लावणार हे निच्छित होईल. त्यामुळे शिवसेना युती करणार की नाही . तसेच किती जागांसाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू आहे. याची उत्तरे मिळू शकतील.

1 Comment

Click here to post a comment