fbpx

राष्ट्रवादीच्या दोन ‘हिऱ्यांची’ घरवापसी 

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप असा चारही प्रमुख पक्षांमधील प्रवास करुन झाल्यावर आता भाजपमध्ये नाराज असलेले प्रशांत हिरे आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे पितापुत्र राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

ऑगस्ट महिन्यातच हिरे यांचं राष्ट्रवादीत पुनरागमन होणार होतं. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांबरोबर मतभेद असल्यामुळे त्यांचा प्रवेश लांबला होता. आता भुजबळांशी समेट झाल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. अपूर्व हिरे हे भाजपचे नाशिकमधून विधान परिषदेचे आमदार होते. उत्तर महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी हिरे पितापुत्रांचं राजकीय वर्चस्व होतं. भुजबळ समर्थकांनी काढलेल्या मोर्चालाही अपूर्व हिरे यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी भाजप आमदाराची ही भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप नेतृत्वाला हिरे कुटुंबाने एकप्रकारे दिलेला इशाराच होता.

निवडणुकीच्या आखाड्यात यापुढे उतरणार नाही : पवार