प्रशांत गडाख म्हणतात ‘त्या’ केवळ अफवा, मी सुखरूप असून तुम्हाला लवकरच भेटेल…

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आणि नेवासा तालुक्यातील युवा नेते प्रशांत गडाख एका मोठ्या आजारातून नुकतेच बाहेर येत असून त्यांच्याबद्दल उठत असलेल्या अफवांना त्यांनी फेसबुक पोस्टमधून उत्तर दिल आहे. Scizure Convulsion (शरीरास अचानक बसलेला तेज झटका ज्याला नियंत्रित करणं फारच अवघड जातं) या आजारामुळे प्रशांत गडाख त्रस्त आहेत. अशात तालुक्यात अनेक अफवांना पेव फुटला असून गडाख यांनी त्याला उत्तर दिल आहे.

काय आहे प्रशांत गडाख यांची फेसबुक पोस्ट

गेल्या गुरुवारी मी दिल्लीहून नगरला आलो. कपडे बदलून साहेबांकडे गप्पा मारायला गेलो. काही वेळात अचानक एखादी मशीन हादरते तसे माझे शरीर हादारायला लागले. आणि नंतर मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर चार दिवसांनी मला घरच्यांनी सांगितलं की हे हादरणं जवळजवळ दोन ते तीन मिनिटं चालू होतं. डॉक्टर म्हणाले हा Scizure Convulsion (शरीरास अचानक बसलेला तेज झटका ज्याला नियंत्रित करणं फारच अवघड जातं) चा प्रकार होता.

Loading...

गेल्या १५ ते २० दिवसांपासून ताण-तणाव, अवेळी जेवण, प्रवास, पाणी कमी पिणे, जागरण अशा गोष्टींमुळे हे सर्व माझ्या आयुष्यात घडलं. आणि त्यात दुर्दैवाने माझे दोन्ही खांदे निखळले. आणि महत्त्वाचं असं की पाठीच्या L-1 मणक्यास थोडासा झटका बसला. तो जर जास्त डॅमेज झाला असता तर पायाचे सेन्सेशन जाणे असे अनेक प्रकार उद्भवले असते. डॉक्टर म्हणाले सुदैवाने मेंदूला कुठलीही इजा झाली नाही. निखळलेले खांदे लगेच डॉक्टरांनी बसविले. मणक्याचे ऑपरेशनही तातडीने करावी लागले. पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले डॉक्टर दीपक यांचे हॉस्पिटल, घरच्या सारखे काळजी घेणारे डॉ. दीपक, डॉ. देशपांडे व डॉ. सांब यांसारखे डॉक्टर्स यामुळे हे शक्य झालं.

हे सर्व सांगण्याचे कारण अफवा… आणि हे सर्व पसरविणारे ठराविक विकृत मंडळी. परंतु सुदैवाने जास्त इजा झाली नाही ती फक्त आणि फक्त जनतेच्या माझ्यावरचे प्रेम, आशीर्वाद आणि गडाख साहेबांची पुण्याई यामुळेच मी आज सुस्थितीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रवास टाळणे आणि दोन ते तीन महिने विश्रांती घेणे एवढा एकच पर्याय माझ्यासमोर आहे. असंख्य लोकांना मला भेटायचंय परंतु लवकरच मी आपणांस घरी भेटेल. आणि हो मला एज्युकेशन वर आलेलं संकट आणि त्यामुळं वैयक्तिक मला झालेला त्रास आणि गलिच्छ अफवा या सगळ्याबद्दल जाहीर बोलायचंय. तुमच्या सर्वांच्या सद्भावनेने मी लवकरच बरा होऊन येईल आणि जाहीर आपल्यासमोर काही गोष्टी सांगेल. आपणा सर्वांच्या आशीर्वादासह इथेच थांबतो.