प्रशांत दामले यांनी चित्रपटांपासून लांब असण्यामागचे सांगितले कारण

प्रशांत दामले

मुंबई :  प्रशांत दामले हे नाव उच्चारले की आठवते ती मराठी रंगभूमी. मराठी रंगभूमीवर प्रेम करणारे एक सच्चा रंगकर्मी म्हणून प्रशांत दामले यांची ओळख. रंगभूमीवर एका दिवसात तीन वेगवेगळ्या नाटकांचे ५ प्रयोग करण्याचा विक्रम त्यांनी अपल्या नावे केला आहे. नाट्य रसिकासाठी सतत काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरुच असतो. प्रशांत दामले यांनी नाटकासह अनेक मराठी चित्रपटात देखील उत्तम अभिनय केला आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते चित्रपटांपासून लांब असल्याचे दिसत आहे. तर रंगभूमीवर अधिक असल्याचे पाहायला मिळाले.

एका मुलाखतीत प्रशांत दामले यांनी चित्रपटांऐवजी रंगभूमीवर अधिक काम करण्याचं कारण सांगितले आहे.  ‘चित्रपट, मालिका यामध्ये भरपूर पैसे मिळतात. कदाचित प्रसिद्धी देखील भरपूर मिळते. परंतु माझं ते ध्येय नाही. मला अभिनयापेक्षा गायनात रस आहे. मला रंगभूमीवरच काम करायला अधिक आवडतं. रंगभूमीवर काम करताना मला मानसिक आनंद अधिक मिळतो. त्यामुळे आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर पैशांसोबतच मानसिक शांतता देखील महत्वाची असते. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी मी रंगभूमीवरच करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक पडद्यामागील लोकांना या काळात प्रशांत दामले यांनी मदत केली. मागील काही महिन्यापूर्वी कोरोना नियमामुळे प्रेक्षकांची मर्यादीत संख्या यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे पाठ फिरवू लागले होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशांत दामले यांनी प्रायोगिक तत्वावर नाटकाचे तिकीटाचे दर कमी करण्याचा निर्णय  देखील घेतला होता.

सध्या प्रशांत दामले सध्या ‘तू म्हणशील तसं’ हे नव्या नाटकामध्ये काम करत आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत प्रसाद ओक, संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओक याने केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या