प्रशांत भूषण यांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी

prashant bhushan

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटार सायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. हीच टिप्पणी न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आज प्रशांत भूषण यांनी दोषी ठरवले आहे.

20 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात याविषयीच्या शिक्षेबद्दलची सुनावणी होणार आहे. प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीट्सबद्दल सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो म्हणजेच स्वतःहून तक्रार दाखल केली होती. न्यायमुर्ती अरूण मिश्रा, न्यायमुर्ती बी.आर.गवई आणि न्यायमुर्ती कृष्णमुरारी यांच्या खंडपीठाने भूषण यांना दोषी ठरविले आहे.

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कंटेप्ट ऑफ कोर्ट्स अॅक्ट 1971, नुसार प्रशांत भूषण यांच्यावर कारवाई होऊ शकते यामध्ये त्यांना सहा महिन्यांपर्यंत देखील शिक्षा होऊ शकते.जर प्रशांत भूषण यांनी माफी मागितली तर त्यांना कोर्टाकडून सूट मिळू शकते अशी देखील कायद्यात तरतूद आहे.

प्रशांत भूषण यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते किंवा दोन हजार रूपये दंड किंवा दोन्हीही. त्यांच्याकडे आता दोन पर्याय आहेत. एक तर ते रिव्ह्यू पेटिशन टाकू शकतात. रिव्ह्यू पेटिशनसाठी बेंच बदलणार नाही.

बॅडमिंटन खेळाडूंना सराव करण्यासाठी परवानगी द्यावी : क्रीडा समितीच्या बैठकीत ठराव

‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आला असाल तर स्वत: विलगीकरणात जा; महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळा, तुकाराम मुंढे यांचे आवाहन