fbpx

साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितलाही जामीन मंजूर

PUROHIT GETS BAIL

नवी दिल्ली : 2008 मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कर्नल पुरोहितेन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहितच्या सुटकेचा मात्र मोकळा झाला होता. पुरोहितला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. ९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना जामीन मिळाल्याने पुरोहित यांच्या कुटुंबीयाने न्यायालयाचे आभार मानले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.अस असलं तरीही त्याच्यावरील खटला सुरुच राहणार आहे.आपल्या अर्जावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती कर्नल पुरोहित यांनी खंडपीठास केली, परंतु सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली होती. पुरोहित यांचा अर्ज जेव्हा बोर्डावर येईल त्यावेळी सुनावणी घेऊ, असेही सरन्यायाधीश खेहर यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर आज सुनावणी दरम्यान त्यांनी जामीन मंजूर केला.

2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.