मुंबई: महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष जोरदार टिका करत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार निवडून आल्यापासून विरोधी पक्ष म्हणजेच भाजप या महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळे हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष सातत्याने करत असल्याचे दिसत आहे. आशातच भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी बोचऱ्या शब्दात राज्यसरकारवर टीका केली आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने दिलेल्या जनाधाराला धूडकावून स्थापन झालेले व सत्तेच्या सारीपाटात राज्यावर लादले गेलेले सरकार म्हणून ‘महाविकास आघाडी सरकार’ची ओळख आहे, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी त्यांच्या ब्लॉग मधून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मागील २ वर्षांतील कामगिरीकडे पाहिले तर ‘राज्यावर लादले गेलेले सरकार’, ही त्यांची ओळख अधिक स्पष्ट होते, असंही ते म्हणाले.
कोविडच्या नावाखाली राज्याच्या विकासाला खीळ बसवणाऱ्या आघाडी सरकारच्या काळातील ‘विकास कामे शोधून दाखवा आणि बक्षिस मिळवा’ असे म्हणण्याची वेळ आज महाराष्ट्रावर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय क्षमतेच्या अभावामुळे तसेच त्यांच्यातील अंतर्गत कलहामुळे राज्यातील जनतेची कामे आणि विकास प्रकल्प रखडले. परंतु याला कोण जबाबदार, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही तर…- अमोल कोल्हे
- निती आयोगाने मोदी सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला आहे; कॉंग्रेसची टीका
- ‘मराठवाड्यातील नेत्यांनी घोटाळ्यातील पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले’
- पंतप्रधान मोदींनी मानवता दाखवून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी- राहुल गांधी
- चाळीशीच्या पुढील नागरिकांना बुस्टर डोस द्या; वरिष्ठ शास्त्रज्ञांची केंद्राकडे शिफारस
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<