Share

Prasad Lad | प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाईंना इशारा, म्हणाले…

Prasad Lad | मुंबई :  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर  महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Airbus Project)  महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) आणि महाविकास आघाडीवर (MVA) फोडलं आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड (Prasad Lad)

प्रसाद लाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. 21 सप्टेंबर 2021 मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, असं लाड यांनी म्हटलं आहे.

पुढे प्रसाद लाड यांनी असंही म्हटलं आहे की,  आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झालं आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांचं पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावं.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून होणाऱ्या टीकांना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, तर केवळ गप्पा मारून, त्यांच्यात संभ्रम निर्माण करून किंवा ट्वीट करून उपयोग नाही. सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करायचे, हा पळपुटेपणा योग्य नसल्याचं सामंतांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Prasad Lad | मुंबई :  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर  …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now