Share

Prasad Lad | शिवरायांवरील विधानानंतर प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले,

Prasad Lad | मुंबई : काल मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं म्हटलं होतं. प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला. त्यानंतर विविध स्तरातून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

प्रसाद लाड यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते ,म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं.”

पुढे ते म्हणतात, “मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं.” माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”, असे प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

“स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली,” असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Prasad Lad | मुंबई : काल मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now