‘सत्ता आज आहे, उद्या नाही… सत्तेचा एवढा माज बरा नव्हे’

'सत्ता आज आहे, उद्या नाही... सत्तेचा एवढा माज बरा नव्हे'

हिंगोली : वसमतचे आमदार तसेच राष्ट्रवादी पक्षातील नेते राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमणात टीकेची झोड उठते आहे. झाले असे की वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला आहे.ज्या वेळेस नवघरे पुतळ्यास हार घालण्यास वर चढले त्यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून महाराजांना हार घातला.त्यामुळे त्यांच्यावर समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर नवघरे यांना अश्रू अनावर झाले आणि झालेल्या प्रकरणावर माझ्या कडून चूक झाली मी यासाठी सगळ्यांची माफी मागतो पुढे ते म्हणाले की भाजपचे शहराध्यक्ष तसेच , मुंदडा पण तिथे होते परंतु माझाच व्हिडिओ पसरवला जात असल्याचे असे राजू नवघरे म्हणाले.

या घटनेवर अनेक राजकीय मंडळीनी आपले मत समाज माध्यमावर मांडले आहे अशातच भाजपचे प्रसाद लाड यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यांनी जनाची मनाची दोन्ही सोडून दिलेली दिसतेय, सत्ता आज आहे, उद्या नाही सत्तेचा एवढा माज बरा नव्हे,तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात आहात हे विसरू नका असा शब्दात लाड यांनी नवघरे यांना सुनावले.

महत्त्वाच्या बातम्या