पुस्तकी ज्ञानाबरोबर कलेला द्या प्राधान्य : आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : केवळ पुस्तकी ज्ञानाला प्राधान्य नको, कलेलाही महत्त्व देणे आपले कर्तव्य आहे. पालकांनी मुलांच्या कला गुणांना महत्त्व द्यावे, सर्वच कलेला हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे, सांस्कृतिक ज्ञानाची समृध्दीचे जतन होईल. तसेच कलेमुळे व्यक्तीला खऱ्या जीवनाचा अर्थ कळण्यास मदत होईल. कला ज्यांना अवगत आहे ते भाग्यवान आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला, शिक्षक संघातर्फे आयोजित जीवन गौरव पुरस्कार, आदर्श कला शिक्षक जिल्हा पुरस्कार आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रंगभरण स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन सत्कार केला. राज्यस्तरीय ऑन दी स्पॉट निसर्गचित्राचे परीक्षक म्हणून सुदर्शन देवरकोंडा, विराक्षी क्षीरसागर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक शांतप्पा काळे यांनी केले.