‘ये सफर बहोत है कठीण, ना उदास हो मेरे हमसफर’ – प्रणिती शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक ही विकासाच्या,जनसंपर्काच्या व गोरगरिबांच्या कल्याणाच्या आधारे झाली नाही. परंतु याही परिस्थितीवर काँग्रेस पक्ष सक्षमपणे मात करेल, सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची सेवा केली,कार्यकर्त्यांना ताकद दिली असून आम्ही पराभवाने खचणार नाही, पुन्हा जिंकून दाखवू असा ठाम विश्वास बैठकीत व्यक्त केला.

सोलापूर काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन येथे या भरवण्यात आली होती.त्या प्रसंगी ते बोलत होत्या .या बैठकीस माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, नलिनीताई चंदेले, सुशीला आबुटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, आदी उपस्थित होते.

Loading...

यावेळी आ.शिंदे यांनी,’ ये सफर बहोत है कठीण, ना उदास हो मेरे हमसफर, ये है अगले मोड पर मंझिल एक, नही रहनेवाली मुश्कीले, मेरी बात पर यकीन कर, ना उदास हो मेरे हमसफर अशी शायरी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर सांगून जोश निर्माण केला.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदार नोंदणी, आरोग्य शिबीर, व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबवावे, येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उभा करू. जातीधर्मावर फूट पाडणाऱ्या विचारांच्या विरोधात आपली लढाई शेवटी सत्याचाच विजय होतो. पुन्हा संघटित होऊन लढू या. सत्ता असो वा नसो सदैव जनतेच्या सेवेत राहू. आम्ही खचणार नाही पुन्हा जिंकून दाखवू असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार