fbpx

‘मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला, फवारणी करुन पुढच्या वर्षी हाकलून लावा’

praniti shinde

टीम महाराष्ट्र देशा- कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका करताना मुक्ताफळांची उधळण केली आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे, त्यांचं नाव आहे मोदीबाबा, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं आहे.विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सोलापूरचे खासदार शरद बनसोडेंचा भाषणात बेवडा म्हणून उल्लेख केला. काँग्रेसच्या काळातील केलेल्या कामाचं उद्घाटन दोन्ही मंत्री आणि बेवडा खासदार करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

सभ्यता,शिष्टाचार,संस्कार यांच्या गप्पा मारणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या उच्चशिक्षित महिला आमदाराने अश्या पद्धतीने वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मिडीयावर शिंदे यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

56 वर्षांनी मिळालेले अभियांत्रिकी महाविद्यालय राजकारणाने दीड वर्षात घालवले