महाराष्ट्राच्या युवकांबाबतचे फडणवीसांचे ‘ते’ वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, प्रणिती शिंदेंनी डागली तोफ

praniti shende devendra fadnvis

मुंबई : स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांनंतर महाआघाडी सरकारने भूमिपुत्रांना यामध्ये संधी देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमीपुत्रांकडे कौशल्यच नाही, ते विकसित करता येणं शक्य वाटत नाही, अशा आशयाचे संतापजनक विधान केले होत. त्याचा चांगलाच समाचार कॉंग्रेसच्या नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्रातील मुलांमध्ये स्किल नाही हे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. मी ह्या वक्तव्याचा निषेध करते. महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहे त्यांना कमी लेखू नये.! असा हल्ला प्रणिती शिंदे यांनी चढवला आहे.

तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहेत. फडणवीस साहेब यांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये. जे मजूर गेले ते परत येतील, त्यांचे स्वागत आहे. पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

फडणवीस साहेब इथल्या युवकांना कमी लेखू नका, जयंत पाटलांनी घेतला फडणवीसांचा समाचार

दरम्यान, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थान मिळाल्यास मला आनंदच, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यासाठी तरुणांना तसं कौशल्यही द्यावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. तो जर निघून गेला तर महाराष्ट्रातील कुठल्या कामगाराला ते कौशल्य लगेच आत्मसाद करता येणार आहे. ते कौशल्य त्याला आधी शिकावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण ; आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका