माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान

टीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात झाले.

प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ पर्यंत काम पहिले. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी काम केले आहे. राष्ट्रपती पदापुर्वी त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पी. ए. संगमा यांचा पराभव केला होता.

या कार्यक्रमात भूपेन हजारिका यांचा सन्मान हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी हा मरणोत्तर पुरस्कार स्वीकारला. तर, दीनदयाल संशोधन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांनी नानाजी देशमुख यांना जाहीर झालेला भारतरत्न स्वीकारला. २५ जानेवारी २०१९ ला यापुरास्कारांची घोषणा करण्यात आली होती त्याचे गुरुवारी वितरण झाले.

दरम्यान, या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला तप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रणव मुखर्जींनी संघाला राजधर्म शिकवला – कॉंग्रेस

जम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी ?

पाऊस ना पाणी तरीही इंदापूर तालुक्याला पुराचा फटका