आरएसएसपासून सावध राहा; प्रणव मुखर्जींना मुलगी शर्मिष्ठा यांचा सल्ला

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी आज र्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम आज संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

दरम्यान त्यापूर्वी मुखर्जी यांना सांभाळू राहण्याचा सल्ला त्यांची मुलगी व काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिला आहे. संघ तुमचा चुकीचा वापर करण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे, तुम्ही सावध राहा असं शर्मिष्ठा यांनी म्हंटलं आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीट करत आपल्या वडिलांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय.Loading…
Loading...