संघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी येणे यात गैर काय ?- नितीन गडकरी

Pranab mukharji

टीम महाराष्ट्र देशा: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी संघावर टीकेची झोळ उठवली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी येणे यात गैर काय, त्यांचे स्वागतच आहे, असे स्पष्ट केले आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी सात जून रोजी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

भारताच्या माजी राष्ट्रपतींना आम्ही नागपूरमध्ये संघ स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत.

“माजी राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारणं म्हणजे महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद साधण्याचा देशाला दिलेला संदेश आहे. आणि मतं विरोधी असणं म्हणजे शत्रू असणं असं नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांना हे निमंत्रण स्वीकारणं हे उत्तर आहे,” असं मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.