fbpx

प्रणव मुखर्जी आज करणार संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन

नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी आज र्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम आज संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे.दरम्यान प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी मुखर्जी यांनी देखील मला काय बोलायचं आहे ते मी थेट नागपुरातच बोलेलं असं सांगितले होते. दरम्यान आता प्रणव मुखर्जी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रणव मुखर्जी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील यावेळी वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर स्मृतिमंदिरातच प्रणव मुखर्जी हे सरसंघचालक आणि संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत भोजनदेखील करणार आहेत. रेशीमबाग मैदानावर संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.