fbpx

प्रणव मुखर्जींनी संघाला राजधर्म शिकवला – कॉंग्रेस

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यांनी संघाचा तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळ्याला हजेरी लावली. हा कार्यक्रम संपल्यानंतर सुरजेवाल यांन पत्रकार परिषद घेऊन प्रणवदांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. प्रणव मुखर्जी यांचा संघाच्या कार्यक्रमात जाण्याचा निर्णय सार्थ ठरलाय. त्यांनी संघाला आरसा दाखवलाय अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी केलीये.

प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे यावर वाद झाला. पण त्यांचा दौरा सार्थ ठरलाय ते जे बोलले ते काँग्रेसचे विचार होते. त्यांनी संघाच्या मुख्यालयात जाऊन संघाला आरसा दाखवलाय. भारताचा गौरवशाली इतिहास सांगितला. प्रणवदांनी मोदी सरकारला राज धर्म शिकवला अशी टीका सुरजेवालांनी केली.संघाने आता आपली चूक स्वीकारण्यास तयार आहे का ?, दलित, महिला आणि अल्पसंख्याकांच्या विरोधातील भूमिका मागे घेण्यास तयार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.