प्रणब मुखर्जी माझ्यापेक्षा पंतप्रधान पदासाठी सरस होते !

टीम महाराष्ट्र देशा: सन २००४ मध्ये सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. मात्र, माझ्यापेक्षा त्यावेळी या पदासाठी प्रणबदा अधिक योग्य व्यक्ती होते. त्यावेळी माझ्याकडे इतर कुठलाही पर्याय नसल्याचे त्यावेळी प्रणबदांनाही माहिती होते. तेव्हा प्रणबदा नाराज होणे साहजिक होते अशी सरळ कबुली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली आहे.

नवी दिल्लीत प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडाचा प्रकाशन सोहळा पार पडला, त्यावेळी मनमोहन सिंग बोलत होते. यावेळी अजून बोलताना मनमोहन सिंग यांनी आपले सहकारी मुखर्जी यांच्यासोबतच्या नात्याचा उलगडा देखील केला.