सिंंधुदुर्गात प्रमोद जठार यांचे गुडघ्याला बाशिंग

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची माझी तयारी आहे अशी इच्छा सिंधुदुर्ग भाजपचे अध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना नवीन विषय मिळाला आहे. कारण नारायण राणे यांच्यासोबत भाजपने हात मिळवणी केली असून शिवसेनेशी देखील युती बाबत चर्चा सुरु असल्याने भाजप पक्ष प्रमोद जठार यांची इच्छापूर्ती करणार कि मित्रपक्षांना हि जागा सोडणार या बाबत पेचात पडण्याची शक्यता आहे.

सध्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी येथे शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. जर शिवसेना भाजप यांची जर युती झाली तर ह्या जागेसाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तसेच जर नारायण राणे आणि भाजप यांची युती झाली तर निलेश राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमोद जठार यांची इच्छापुरती होईल कि नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच प्रमोद जठार यांनी भाजपमधून राणे यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली होती. त्यामुळे भाजपने जर प्रमोद जठार यांचे नाव अंतिम केले तर नारायण राणे नाराज होण्याची शक्यता आहे.