प्रकाश आंबेडकर दिलेली वेळ पाळत नाहीत : वडेट्टीवार

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर लागलेले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली असून वेगवेगळ्या पक्षांसोबत बैठकीचे सत्रही सुरु आहे. अशातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर फोनवर वेळ देतात पण दिलेली वेळ पाळत नाहीत अस विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसला ४० जागा सोडण्यात येतील असं जाहीर केले आहे. याविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, वंचितने आम्हाला ४० जागा देण्याचे ठरविले आहे तरीही आम्ही बसून चर्चा करू. मी स्वतः पुढाकार घेत यासंबंधी चर्चेला गती देणार आहे. त्यांना पत्र पाठविणार आहोत. वंचित आघाडीला केवळ सहा टक्‍के मते मिळाली आणि कॉंग्रेसला अधिक असली तरी आम्ही चर्चेला तयार आहोत. तसेच प्रकाश आंबेडकर फोन वर वेळ देतात. पण वेळ पाळत नाही अस विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी मनसेसोबत आघाडीचा विषय सध्या कॉंग्रेसच्या अजेंड्‌यात नसून याबाबत राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याचही वडेट्टीवार यांनी सांगितले.