पाकिस्तानने खऱ्या नोटा तिकडे नेल्या आणि बनावट नोटा रिझर्व  बॅकेत जमा केल्या :आंबेडकर

Prakash-Ambedkar

अकोला/प्रतिनिधी:. पाकिस्तानने आपल्या देशातील खऱ्या  नोटा तिकडे नेल्या आणि सुमारे १८ टक्के बनावट नोटा रिझर्व  बॅकेत जमा करण्यात आल्याचा भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर दावा आंबेडकर यांनी केला. ही बाब खरी नसेल तर रिझर्व  बँकेने माझ्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकावा, असे आव्हानही त्यांनी दिले भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गेल्या तब्बल ३२ वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या  दिवशी अकोल्यात भव्य मिरवणूक आणि सभेचे आयोजन केले जाते. यावर्षीही ही परंपरा जोपासीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविंद्र दारोकार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रकाश आंबेडकर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

नोटाबंदीच्या काळात भारतात १८ टक्के बनावट नोटा आल्या असून, गेल्या तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रणीत भाजप सरकारने घेतलेले निर्णय हे हुकुमशाहीची पाळेमुळे असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवात मोदी आणि फडणवीस सरकारचे वाभाडे काढताना केला.  गेल्या तीन वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाने अर्थात केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारने आपल्या बहुमताचा लाभ उठवीत देशातील कामगार, शेतकरी आणि युवक वर्गाच्या विरोधात निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. ही त्यांची कृती देशाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे. या प्रवृत्तीला वेळीच तीव्र विरोध करण्याची गरज आज निर्माण झाली असल्याचे सांगतानाच प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र  आणि राज्यातील भाजप सरकार सर्व आघड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी बांधकाम व्यवसायातीलल कामगारांवर अन्याय, नोटाबंदी,शेतकऱ्याना कर्जवाटप या तीन प्रमुख मुद्द्यांना हात घातला. नोटाबंदी हा मोदी सरकारचा पुरता फ्लॉप शो असल्याचे स्पष्ट करताना आंबेडकर यांनी नोटाबंदीच्या काळात देशात ९९ टक्के पैसा परत जमा झाल्याचे सांगतानाच या दरम्यान देशात बाहेरुन सुमारे १८ टक्के बनावट नोटा आल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानने आपल्या देशातील खऱ्या  नोटा तिकडे नेल्या आणि सुमारे १८ टक्के बनावट नोटा रिझर्व  बॅकेत जमा करण्यात आल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला. ही बाब खरी नसेल तर रिझव्र्ह बँकेने माझ्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकावा, असे आव्हानही त्यांनी दिले.