शरद पवार ती चूक कधीच करणार नाहीत- आंबेडकर

PAWAR

अकोला- माजी कृषिमंत्री शरद पवार NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. चर्चा कितीही रंगत असल्या तरी शरद पवार तशी चूक कधीही करणार नाहीत अस मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल आहे

रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, यामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार असून काही नवीन मंत्र्यांना संधी मिळणार आहे. या केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने शरद पवारांना केंद्रात पुन्हा भाजपकडून कृषी मंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सुरु होती . सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती .
चर्चेला पूर्णविराम देत शरद पवार यांनी NDAसोबत जाणार नसल्याच स्पष्ट देखील केल आहे.

या सगळ्या चर्चांच्या पृष्ठभूमीवर प्रकाश आंबेडकर यांना त्यांचे मत पत्रकारांनी विचारले तेव्हा शरद पवार भाजपसोबत जाण्याची चूक कधीही करणार नाहीत. असे मत त्यांनी व्यक्त केले. जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोणासोबत जायचे याबाबत आपल्या समर्थक नेत्यांशी चर्चा केली, सोबतच्या सर्व नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजप सेनेसोबत जायचे नाही भाजप सेनेसोबत जायचे असेल तर आम्ही सोबत येणार नाही भूमिका घेतली होती, त्यामुळे पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करावी लागली. तेव्हा अशी भूमिका घेणारे आजही राष्ट्रवादी मध्ये त्यांच्यासोबत आहेत आणि ते सर्व नेते आजही त्याच आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे अश्या परिस्थितीत पवार भाजपसोबत जाण्याची चूक करणार नाहीत.