ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर…; प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर…; प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

Uddhav Thackeray

मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, राज्यातील राजकीय नेते ओबीसी (OBC) आरक्षणाचा मुद्दा लावून धरत एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज भाजप नेत्या पंकजा (Pankaja  Munde) मुंडे, भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण, वस्तीगृह, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच इतर मुद्यांना घेऊन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी राज्य सरकारला घेरलं. ओबीसींच्या मुद्यावर सरकार कुठेही आग्रही नाही. सारथीला सगळं काही मिळतं मग महाज्योतीला काहीच कसं मिळत नाही. विद्यार्थी वेतनाला पैसे मिळत नाहीत, असा आरोप शेंडगे यांनी केला. तसेच येत्या 26 तारखेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. तरीदेखील ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर, राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पैसे कुठे गेले याची सरकार चौकशी करत नाही ‘सारथी’ला सगळं काही मिळतं मग ‘महाज्योती’ला काहीच कसं मिळत नाही. विद्यार्थी वेतनाला पैसे मिळत नाहीत. महाज्योतीच्या योजनेतून पायलट बनवण्यासाठी अडीच कोटी रूपयांचं कंत्राट दिलं गेलं. मात्र त्या कंपनीकडे एकही विमान नाही. कंपनी आधीच बंद पडलेली आहे. ही कंपनी नागपूरची आहे. महाज्योतीचे अध्यक्षही नागपूरचेच आहेत. पैसे कुठे गेले याची सरकार चौकशी करत नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या