देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा : जेव्हा गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून हाकलपट्टीचा ठराव आला तेव्हा मी, संभाजी पवार, सुरेश हाळवणकर या आमदारांनी त्याला जोरदार विरोध केला होता. तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का गप्प बसले होते. तेव्हा त्यांनी मुंडेसाहेबांची बाजू का घेतली नाही, असा प्रश्न माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी विचारला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडे यांना सर्वाधिक त्रास दिला, असा आरोप केला होता. त्या आरोपाला प्रकाश शेंडगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ”जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या हाकलपट्टीचा ठराव भाजपमध्ये मांडला जात होता; तेव्हा मी त्याला जोरदार विरोध केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मात्र गप्प बसले होते. ते तेव्हा काहीच बोलले नाहीत,

मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माझ्यासारखा कोणाचाही प्रवेश झाला नव्हता. मात्र मलाही उमेदवारी नाकारली. कारण मी गोपीनाथ मुंडे यांच्या सर्वाधिक जवळचा होतो. मी सावलीसारखा मुंडे यांच्यासोबत होतो. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मी त्यांना त्रास दिला असे म्हणत आहेत. या उलट्या बोंबा आहेत. असा दावाही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :