बस ६०० फुट खोल दरीत कोसळूनही असे बचावले प्रकाश सावंत-देसाई

टीम महाराष्ट्र देशा – महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ६०० फूट खोल कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये ३३ प्रवाशी होते. या बस अपघातात ३२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वर येथे फिरायला निघाले होते.

दापोली विद्यापीठ येथील ३० पेक्षा अधिक कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील ३2 प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केवळ एकच जन या दुर्घटनेतून बचावला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलादपूर पोलिस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. ही बस दापोली येथील असल्याचे समजते.

असे बचावले प्रकाश सावंत-देसाई :

प्रकाश सावंत-देसाई हे कृषी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बस दरीत जात असताना प्रकाश एका खिडकीतून बाहेर फेकले गेले. झाडाच्या आधाराने ते बचावले आणि नंतर फांद्यांना धरूनच साधारण अर्ध्या तासात रस्त्यावर पोहोचले. घाटातील वाहनांना अडवून त्यांनी अपघाताची माहिती दिली आणि कृषी विद्यापीठातील वरिष्ठांनाही घडलेली घटना सांगितली. त्यानंतर वेगाने सूत्रं हलली आणि स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकं वेगानं घटनास्थळी पोहोचली.

काकासाहेबाला वाचवता आलं असत मात्र निवेदन देऊन प्रशासनाचा काना डोळा

मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच; फडणवीसांच्या डोक्यावर पवारांचा हात

You might also like
Comments
Loading...