fbpx

जयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक !

टीम महाराष्ट्र देशा : सिंघम,दबंग यांसारख्या सुपर डुपर हिट सिनेमांमध्ये विलेन म्हणून राजकारण्याचा रोल गाजवणारा एक लोकप्रिय कलाकार प्रकाश राज आता खर्या खुर्या आयुष्यात राजकारणात उतरला आहे. बेंगळूरूमधून प्रकाश राज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आज प्रकाश राज यांचा वाढदिवस आहे. ते आज ५४ वर्षाचे झाले. ते बेंगळूरू येथे राहणारे आहेत. बेंगळूरूमधून प्रकाश राज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बेंगळूरूमधून प्रकाश राज भाजप खासदार पी. सी. मोहन यांना आव्हान देतील. आपल्या अक्टिंग स्कील वर लोकप्रिय झालेले प्रकाश राज यांना लोकसभा निवडणुकांमध्ये या लोकप्रियतेचा किती फायदा होतो हे पाहावे लागेल. त्यांनी हिंदी, तेलुगु. कन्नड सिनेमांमध्ये कामे केली आहेत. त्यांनी ज्या सिनेमांमध्ये विलेन म्हणून काम केले आहे त्याला प्रेक्षकांनी भरभरून दिली आहे.