अब कि बार जनता कि सरकार, प्रकाश राज आता लोकसभेच्या मैदानात

prakash-raj

टीम महाराष्ट्र देशा : सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज  यांनी अब कि बार जनता कि सरकार म्हणत राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रक्षेकांवर भुरळ घालणारे प्रकाश राज राजकीय आखाड्यात देखील विरोधकांना धूळ चारताना दिसणार आहेत.

दाक्षिणात्य अभिनेते असणारे प्रकाश राज यांनी मध्यंतरी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच ते समाजामध्ये घडणाऱ्या घटनांवर कायम परखड मत व्यक्त करत आलेले आहेत. प्रकाश राज यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच आपण लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केल आहे.

दरम्यान, नूतन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन सुरुवात करत असून, आपल्या सर्वांच्या पाठींब्याने लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश राज यांनी सांगितल आहे. तसेच आपण कोणत्याही पक्षाकडून न लढता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं हि त्यांनी स्पष्ट केल आहे.