मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी खास उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट लिहिली आहे.
“तुम्ही खूप छान काम केले आहे उद्धव ठाकरे सर आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले त्यासाठी महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा अधिक काळ टिकेल. तुमच्यात आणखी शक्ती आहे.”, अशी पोस्ट प्रकाश राज यांनी ट्वीटरवर केली आहे.
You did great dear sir @OfficeofUT … and I’m sure people of Maharashtra will stand by you for the way you handled the state.. the Chanakya s may eat laddoos today.. but your genuinity will linger longer .. more power to you.. #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022
सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Urmila Matondkar : “तुमच्या नेतृत्वामुळे…”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया
- Imtiaz Jalil : औरंगाबादचं नाव बदलून मुख्यमंत्र्यांनी घाणेरडे राजकारण केलयं; इम्तियाज जलील यांनी फटकारलं
- Political Crisis : “प्रत्येक लाडूंची किंमत ५० ते १०० कोटी”, कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा
- Bacchu Kadu : लॉजिक की मॅजिक? ठाकरे सरकार कोसळताच ‘त्या’ प्रकरणी बच्चू कडूंना ‘क्लीन चिट’
- Sanjay Raut : नेमकं हेच घडलं! “आपल्याच माणसांनी दिलेले पाठीवरचे घाव…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<