fbpx

मोदीजी बेशरम है ; प्रकाश राज यांची मोदींवर घणाघाती टीका

टीम महाराष्ट्र देशा : साउथ फिल्म इंडस्ट्री चे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी  मोदींवर हल्लाबोल केला आहे. ‘मोदीजी बेशरम है’ असे म्हणत त्यांनी मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सीपीआई उमेदवार कन्हैया कुमार यांच्या प्रचारासाठी गेलेल्या प्रकाश राज यांनी ‘मोदीजी बेशरम है’ असे वक्तव्य केल्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत.

प्रकाश राज हे सेंट्रल बंगळुरू मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. कन्हैया कुमारच्या प्रचाराला गेल्यानंतर लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती, परंतु जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा त्यांनी मोदींवर निशाणा साधत जोरदार टीका केली.

काय म्हणाले प्रकाश राज ?

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींवर टीका करत म्हटले की, मोदीजी बेशरम है, ऐसे प्राईम मिनिस्टर को कभी नही देखा, आर्मी का और इस हमलेका पॉलिटिक्स मत करो. असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील त्यांनी मोदींवर केलेल्या टीकांमुळे ते चांगलेच चर्चेत राहिले आहेत.