प्रकाश मेहता यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

minister prakash mehta

मुंबई: गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान प्रकाश मेहता यांनी ही शपथ घेतली आहे.

Loading...

या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रकाश मेहता हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मेहता यांच्यासह सर्व खेळाडूंनी व्यसनमुक्त होण्याची शपथ घेतली.

प्रकाश मेहता यांना तंबाखू आणि सुपारी खाण्याची सवय आहे. आता यापुढे मी तंबाखूचे व्यसन करणार नाही, असे आश्वासन देऊन मेहता यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.Loading…


Loading…

Loading...