धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन

gopinath munde and dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सईद शूजा या अमेरिकन हॅकरने केलाय. विरोधकांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, कथित अमेरिकन हॅकरने केलेल्या दाव्यानंतर भारतात खळबळ माजली आहे.

मात्र आता गोपीनाथ मुंडेंचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी देखील या वादात उडी घेय धनंजय मुंडेंना चांगलच फटकारलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी अशी मागणी केली होती. मात्र धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असे ही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा अमेरिकन सायबर तज्ज्ञानं केला.

Loading...

या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असल्यानंच गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही त्यानं केला. याबद्दल धनंजय मुंडेंनी आश्चर्य व्यक्त केलं. ‘गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी नेहमीच त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. ‘गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,’ असं मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली