तयारी विधानसभेची : प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट ?

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आता मोर्चेबांधणी करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचे जागावाटप आणि कोस्टल रोडवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मातोश्रीवर झालेल्या भेटीत मुख्यमंत्रीपद तसेच विधानसभेसाठीही जागावाटपासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून जावडेकर यांना पाठविण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत दोन्ही पक्षांकडून कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही.