fbpx

‘एनडीए सरकार समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी कोणतीच कमतरता ठेवत नाही’

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी कोणतीच कमतरता ठेवत नसल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जाव़डेकर यांनी म्हटलं आहे. नव्या सरकारला आज पन्नास दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पन्नास दिवसांत मोदी सरकारनं विविध महत्वपूर्ण मुद्दांवर निर्णय घेतले आहेत. तसंच २०२४ पर्यंत प्रत्येक घरी शुध्द पेयजलाची व्यवस्था या मुख्य उद्देशासाठीचं जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली असल्याचं त्यांनी आवर्जून नमुद केलं. रस्ते, रेल्वे आणि क्रीडा क्षेत्रात कोट्यावधींची गुंतवणुक करण्यास सरकारनं मंजुरी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.