fbpx

पक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भाजपची दारे उघडीच : जावडेकर

टीम महाराष्ट्र देशा- पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून सुमारे १०७ आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. यावरून प.बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली असताना पक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भाजप दार बंद करत नाही, असे सूचक उद्गार केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढले आहेत.

दरम्यान, कर्नाटकमधील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मध्य प्रदेश, राजस्थानातील सरकारबाबतही हेच होणार काय, याबाबत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जावडेकर यांना विचारणा झाली असता, भाजप फोडाफोड करत नसल्याचे स्पष्ट करताना, येणाऱ्यांसाठी दारही बंद करत नसल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.