एक्झिट पोल पेक्षा एक्झाँट पोल महत्वाचा – प्रकाश जावडेकर

prakash jawadekar

टीम महाराष्ट्र देशा : एक्झीट पोल ही एक चर्चा आहे. ही चर्चा खुशाल व्हावी. मात्र, अकरा तारखेला खरे चित्र समोर येणार असून एक्झिटपेक्षा एक्झाँट पोल महत्वाचा आहे, असे म्हणत मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांंनी एक्झिट पोलवर होणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड सुवर्ण महोत्सवानिमित्त लिज्जत रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. नूकत्याच मध्यप्रदेश , राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्याच्या निवडणूका पार पडल्या. निवडणूकीनंतर राजस्थान, मध्यप्रदेश या दोन महत्वाच्या राज्यात सत्तापालट होऊन काँग्रेसचे सरकार येईल अशी चर्चा केली जात आहे.