या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची मते फोडण्याची रणनीती : पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी करत प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील जनतेला आघाडी आणि युती व्यतिरिक्त दुसरा पर्याय दिला आहे. त्यामुळे जनतेने जर पर्याय म्हणून त्यांच्या आघाडीची निवड केली तर याचा फटका कॉंग्रेसच्या आघाडीला बसणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर हे मते फोडण्याचा, विभागण्याचा प्रयत्न करत असून ते भाजपची बी टीम म्हणून कार्य करत आहेत. त्यामुळे लवकरच ते जनतेच्या समोर येईल असा टोला लगावला आहे.आज पृथ्वीराज चव्हाण दै. लोकमतच्या फेसबुकवर लाईव्ह कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली.

यावेळी चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने एक व्यापक भुमिका घेतलेली असल्याने या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाखालचे आघाडी सरकार येणार आहे. मागच्या निवडणुकीत आमच्या चुकांमुळे भाजपला यश मिळाले होते. मात्र आता पुढील सरकार हे आघाडीचे असणार आहे आणि यामध्ये कॉंग्रेस मोठा पक्ष असणार आहे.

दरम्यान राज्यामध्ये या लोकसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या आंबेडकरांच्या आघाडीमुळे दलित आणि मुस्लीम मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या हक्काच्या वोट बँकला धक्का लागण्याची शक्यता आहे.