fbpx

‘शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर देशभरात चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमत आहे. तर विरोधी पक्षांमध्ये अनेक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले पहायला मिळत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू , मायावती अशी भलीमोठी यादी पहायला मिळत आहे. यावर आता डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. इतकचं नव्हे तर ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे विधान आंबेडकरांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नसल्याचे म्हटले आहे.