आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची भूमिका घटनाबाह्य’

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अड़ प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक अड़ प्रा. मुकुंद खैरे यांनी भाष्य केलं आहे. ते आकोला येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Loading...

पुढे बोलताना खैरे म्हणाले, ‘बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सभेतील भाषणात बंद पाळणे, रस्ते अडविणे, जाळपोळ करणे आदी प्रकारची आंदोलने संविधानाला अर्थातच लोकशाहीला कमजोर करतात. यामुळे देशात अराजकता, बेबंदशाही निर्माण होते. तसेच हा बंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाविरुद्ध आहे, असे मत यांनी यावेळी मांडले.

दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरुद्ध आज सर्वोच्च न्यायालयात २२ जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर सर्वोच्य न्यायालयाने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घटनेनुसार सरकारचा कायदा वैध की अवैध ठरविण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी अड. प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला आहे, असा घणाघाती आरोप खैरे यांनी यावेळी बोलताना केला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'