fbpx

प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच सिद्ध होतील

अहमदनगर : ‘भारिप-बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच आता सिद्ध होतील’, असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. मंगळवारी अहमदनगर येथे भाजपच्या मनपा निवडणुकीतील जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकारांशी बोलताना हा दावा केला.
‘त्यांचे त्यांच्याशी संबंध आहेतच, पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर भाष्य करणार नाही’, असेही कांबळेंनी स्पष्ट केले. तसेच भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला काही अघटीत घडू नये म्हणून सरकारद्वारे आवश्यक दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.