याकूब मेमन प्रमाणे भिडे आणि एकबोटेंवर गुन्हा नोंदवा – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा: 1993 च्या बॉम्बस्फोटात ज्याप्रमाणे याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता, पण त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली. तसाच प्रकार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंनी केला आहे त्यामुळे याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल झाले होते, त्याच पद्धतीचे गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा, अशी मागणी भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दरम्यान, भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने देण्यात आली आह. तेव्हा आजच्या बंदमध्ये इच्छेने सहभागी व्हा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आंदोलकांनी संयम ठेवा, जबरदस्ती नको, शांततेने बंद पाळला जावा, असं आवाहन सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना केलं आहे.

Loading...